प्रा. दिलीप नाचणे - लेख सूची

उदारीकरणामुळे शिक्षणातही असमतोल!

गेल्या दशकाच्या प्रारंभापासून देशात सुरू झालेल्या रचनात्मक सुधारणा प्रक्रियेचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर नेमका कोणता परिणाम होईल, याबाबत आजवर विस्तृत वि लेषण झाले आहे. मात्र या ऊहापोहात, या प्रक्रियेचा शैक्षणिक क्षेत्रावर आणि विशेषतः विद्यापीठीय व्यवस्थेवर काय प्रभाव पडेल याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते. कार्यक्रमाचे यश हे प्रामुख्याने तांत्रिक प्रगती, उत्पादकता आणि मनुष्यबळ विकास या तीन …